Monday, 26 August 2024

उत्तम कविता लिहिण्याचे बेसिक तंत्र


कविता लिहिताना शब्दांवर लक्ष दिले की आशय गडबडतो.
आशय सशक्त हवा. तो आधी आपल्या मनासारखा लिहून काढावा. 
ती कविता उस्फुर्त असते. त्या कवितेला नंतर शब्द बदलून आकार द्यावा. पण आशय हरवणार नाही याची काळजी घ्यावी. मग. निर्माण होणाऱ्या रचना खूप सुंदर होतात.
पुढे पुढे आशयाला समर्पक शब्द देखील सुचत जातात..

उदाहरणार्थ 
मुसळधार पावसात पसरलेला हा गारवा 
जणू प्रेमाच्या रसातला शिडकावा

यात मुसळधार पाऊस गारवा आणतो तर प्रेमात भिजलेल्याला शिडकावा हे तृप्ततेचे प्रतीक म्हणून वापरले आहे..

ही ओळ शब्दांत बांधायचा प्रयत्न करू आशय न हरवता.

मुसळधार पाऊस नि त्यातला हा गोड गारवा
जणू प्रेमरसात चिंब ओला करणारा शिडकावा 


मी काही उत्तम कवी नाही. पण आशय लक्षात घ्यावा म्हणून हे उदाहरण उस्फूर्तपणे सुचले तसे दिले. 🙂🙏🏻

Wednesday, 20 November 2013

जमीनीखाली घाम येतोय



विरहाच्या आगीत होरपळतोय
विभक्ती प्रत्यय अनुभवतोय
कसंबसं सन्मानानं जगतोय
पण जमीनीखाली घाम येतोय
-सागर

Wednesday, 6 November 2013

मृत्यू...

मृत्यू...
सर्वांच्या मनांत थैमान घालणारा
कुठे शांत तर कुठे रौद्र रुप धारण करणारा
तरीही...
प्रत्येकाला अमरत्वाचे विष पाजणारा
कधी नकळत उचलून नेणारा
तर कधी हिंस्त्र वेदना देणारा
मलाही...
तो हवाय एका अज्ञात विश्वात नेणारा
एका थंड व बोचर्‍या स्पर्शाने कापवणारा
तसाच जाळणार्‍या उष्म्याने हादरवणारा
हिंस्त्र श्वापदाच्या तोंडाने लचके तोडणारा
मृत्यू...

- सागर

Thursday, 31 October 2013

उर्मीच्या नशेत







डोळ्यांतले तुझ्या आकर्षण ते वेडावणारे
अंग प्रत्यंग तुझे रुपदर्शन ते कापवणारे
हास्य तुझे श्वास माझा रोखून ते धरणारे
उर्मीच्या नशेत वाहता सारे क्षण ते गोठवणारे

- सागर

Tuesday, 10 September 2013

सागराच्या लाटा

सागराच्या लाटा कधी
नि:शब्द वहात असतात
तर कोलाहलात कधी
नुसत्या खळबळत असतात
- सागर